दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला धोबीपछाड.. अवघ्या एका जागेवर मानावे लागले समाधान, तर भाजपा जोमात..
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायतीवर भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटाचे सरपंच निवडून आले आहेत तर पाटेठाण या ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी कोणाचाही अर्ज न आल्याने ते रिक्त होते या ठिकाणीही आमदार राहुल कुल समर्थक यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
तराष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर एका ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आले आहेत
. दौंड तालुक्यातील दहिटणे ,देवकरवाडी , लोणारवाडी, नांदूर , बोरिभडक व पाटेठाण या ठिकाणच्या ग्रामपंचायतीत भाजपा आमदार राहुल कुल यांची सत्ता आली आहे.
दापोडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सरपंच विजयी झाला आहे.
तर डाळिंब येथील ग्रामपंचायतीत सरपंचपदी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
एकंदरीत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कुल गटाने मोठी बाजी मारली आहे. यापूर्वीच्या या आठ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती या कुलगटाच्या ताब्यात होत्या उर्वरित या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होत्या मात्र यंदाच्या निवडणूक निकालावरून एक ग्रामपंचायत वगळता राष्ट्रवादी काँग्रेसला इतर ठिकाणी मोठी धोबीपछाड मिळाली आहे .