ग्रीन क्लबच्या बारामती व पुणे विभागासाठी मास्टर ट्रेनरपदी डॉ. प्रा. अशोक दिवेकर……
दौंड ( टीम – बातमीपत्र)
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या ग्रीन क्लबच्या बारामती व पुणे विभागासाठी मास्टर ट्रेनर म्हणून डॉ. प्रा .अशोक दिवेकर यांची नेमणूक झाली आहे .
महाराष्ट्र शासन व युनिसेफद्वारे राबविण्यात येत असलेल्या ग्रीन क्लब मध्ये महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन तसेच पाण्याच्या बचतीच्या योजना उपायोजना राबवणे पर्यावरण व हवामान बदल याविषयी माहिती वृद्धिंगत करणे पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयीन युवकांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे यासाठी हे अभियान चालू केलेले आहे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध विभागात मास्टर ट्रेनर ची नेमणूक करण्यात आलेली आहे बारामती विभाग व पुण्यातील काही महाविद्यालयसंबंधी कामकाजाचा आढावा घेण्यासाठी व ट्रेनिंग देण्यासाठी डॉ. अशोक दिवेकर यांची मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक केलेली आहे. डॉ.अशोक दिवेकर यांचा पाणी आणि मृदा हा अभ्यासाचा विषय असून या विषयात त्यांनी पीएचडी केलेली आहे. याशिवाय त्यांचे सहा भारतीय पेटंट व एक आंतरराष्ट्रीय ब्रिटनचे पेटंट प्रसिद्ध झालेले आहेत. महाविद्यालय मध्ये भूजल पातळी वाढविणारा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प व गांडूळ खत प्रकल्प तसेच सोलर एनर्जी प्रकल्प उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे. डॉ अशोक दिवेकर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धन व शेती याविषयी संशोधन पेपर प्रसिद्ध केलेले आहेत. त्यांच्या संशोधनामुळे त्यांची मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक झाली असल्यामुळे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल , सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय संस्थेचे सचिव धनाजी शेळके, चंद्रकांत शेळके , सुनील निंबाळकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.