अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करणाऱ्या मुख्य शिक्षक आरोपीस अटक ……
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील मळद मधील शाळेतील शिक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असुन मुख्य आरोपीस अटक केली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दौंड तालुक्यातील मळद गावात शालेय विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड तालुक्यातील मळद येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून विद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलिसांकडून विद्यालयात येऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षक बापुराव साहेबराव धुमाळ ( सध्या रा.बारामती, जि.पुणे) याने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षक बापुराव साहेबराव धुमाळ व शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भिमराव वाखारे , ( नविन माध्यमिक विद्यालय, मळद, ता. दौंड जि. पुणे ). यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक सुभाष भिमराव वाखारे यांना सकाळीच ताब्यात घेतले होते तर मुख्य आरोपी हा फरार होता मात्र पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व दौंड पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी धुमाळ यास रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे.
दरम्यान , घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे , दौंडचे पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.