घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक, मुद्देमाल जप्त – पोलिस निरीक्षक संतोष डोके

दौंड ( टीम- बातमीपत्र)
घरफोडी करून १७ तोळे सोने चोरणाऱ्या चोरट्यास दौंड पोलिसांनी अटक करत मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की , दौंड शहरातील फिर्यादी वैशाली संदीप वाघमोडे (रा. भवानीनगर , दौंड ता. दौंड, जि. पुणे) यांच्या घरी घरफोडी झाली होती.यामध्ये १७ तोळे सोन्याचे दागिने यांची अंदाजे किंमत ७ लाख २० हजार रुपये हे चोरून नेले असल्याची फिर्याद दौंड पोलिसांत दि.१ ऑगस्ट रोजी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण यांनी तपास केला.यामध्ये त्यांनी आरोपी चैतन्य संजय शिंदे (रा. यवत दोरगेवाडी,ता. दौंड जि. पुणे) यास १९ ऑगस्ट रोजी अटक केली व न्यायालयसमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी चैतन्य शिंदे यास सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असता तपासामध्ये आरोपी चैतन्य शिंदे यांनी चोरलेले १७ तोळे वजनाचे सोने हे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण हे करीत आहेत.