नागरिकांच्या जिविताचे आणि मालाचे रक्षण करणे पोलिसांचे कर्तव्यच – पोलिस अधिक्षक पंकज देशमुख
दौंड (प्रतिनिधी)
नागरिकांच्या जीविताचे आणि मालाचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच असल्याचे मत पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले आहे.ते दौंड पोलिस स्थानकात आयोजित दौंड व सासवड उपविभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की , आगामी अनंत चतुर्दशीची तयारी पोलिसांकडून पूर्ण झाली असून त्या अनुषंगाने अधिकारी व स्टाफ त्या त्या पोलीस स्टेशनला दिलेला आहे . दौंड शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा लावणे व ती सुरळीत ठेवणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन मंडळातुन दोन अँटि ड्रोन गन घेण्यासाठीची टेंडर प्रक्रिया आजच सुरू झाली असून लवकरात लवकर हे अँटि ड्रोन गन पोलीस दलाला मिळतील. मात्र आकाशात काही तरंगत असेल तर कोणत्याही अफवेला नागरिकांनी बळी पडू नये . दौंड पोलीस स्थानकातून ज्यांच्यावर तडीपारचा प्रस्ताव आले आहेत त्या प्रस्तावांना लवकर मंजुरी देणार असून गुंड हे मोकाट फिरणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासन नक्कीच घेणार आहे .तसेच गुन्हा दडपणे दाखल न करणे असे काही प्रकार घडत असतील तर 112 वर कॉल करा असे आव्हानही पोलिस अधीक्षक देशमुख यांनी बोलताना केले आहे.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , दौंड चे पोलीस उपविभागीय अधिकारी बापुराव दडस , दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके ,आदींसह दौंड व सासवड उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.