दौंड बंद आंदोलन मागे..
मराठा महासंघाचे विक्रम पवार यांची माहिती, खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या सर्व मागण्या मान्य
दौंड (BS24NEWS) दौंड बंद आंदोलन मागे घेण्यात येत आहे अशी माहिती मराठा महासंघाचे विक्रम पवार यांनी दिली.
मराठा आरक्षणाचे प्रणेते, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाविषयीच्या असणाऱ्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले होते. या दरम्यान यांची प्रकृती देखील खालावली होती परंतु त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास देखील नकार दिला होता. या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी (दि. १ मार्च) रोजी दौंड बंदची हाक देण्यात आली होती.
महावितरण कडून विद्युत रोहित्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी
राज्य सरकार बरोबर झालेल्या चर्चेनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली असल्याने दौंड मध्ये होणारे दौंड बंद आंदोलन मागे घेण्यात येत आहे अशी माहिती विक्रम पवार यांनी दिली आहे.