दौंड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप आमदार राहुल कुल यांची सरशी , राष्ट्रवादीचा दारुण पराभव…………
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप प्रणित आमदार राहुल कुल गटाची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.
आज दहा ग्रामपंचायतीसाठी दौंड येथील तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली होती .या दहा ग्रामपंचायतींच्या निकालांमध्ये आठ ठिकाणी भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटाची सरपंच पदी वर्णी लागली आहे तर राष्ट्रवादीचा फक्त एक सरपंच निवडूण आला असून केडगाव या ठिकाणी अपक्ष उमेदवार सरपंच पदी विजय झाला आहे.
वाटलुज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. ती ग्रामपंचायत हि भाजपा आमदार राहुल कुल यांच्या ताब्यात आली असल्याने आमदार राहुल कुल गटाकडे ९ ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत.
यामुळे आमदार राहुल कुल यांनी तालुक्यावर पुन्हा एकदा भाजपचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.