देऊळगावराजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नारायण गिरमकर बिनविरोध
देउळगावराजे (BS24NEWS)
देउळगावराजे (ता. दौंड) येथील ग्रामपंचातीच्या उपसरपंचपदी सोमवारी (दि.28) रोजी नारायण महादेव गिरमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .मावळते उपसरपंच बाबू नारायण पासलकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच स्वाती गिरमकर, माजी सरपंच अमित गिरमकर, आप्पा खेडकर, दादा गिरमकर, कैलास गिरमकर, सर्जेराव गिरमकर, सुरेश कुंभार, दादा सोनवणे,काका कड, भानुदास औताडे ,भरत गिरमकर, भैया साळूंखे,बाबू पासलकर,अण्णा कार्ले ज्ञानदेव गिरमकर आदि मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधिचे सोने करुण सर्वाना बरोबर घेऊन जास्ती जास्त विकास कामे करण्याचा पुढील काळात प्रमाणिक प्रयन्त केला जाईल असे गिरमकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
निवडून निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शेख यांनी कामकाज पाहिले.