अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भारत खराडे
दौंड (टीम – बातमीपत्र)
अखिल भारतीय मराठा महासंघाची राजेगाव येथे पदाधिकारी निवडी बाबत बैठक आयोजित केलेली होती .सदर बैठकीमध्ये राजेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक मराठा चळवळीमध्ये तन-मन-धनाने गेले वीस वर्षे पासून काम करणारे भारत सुखदेव खराडे यांची पूणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करणे बाबत जाहीर करून तसे पत्र अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप व इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप म्हणाले की, मराठा महासंघ ही एक महाराष्ट्र राज्यामधील मराठा समाजाचे न्याय हक्कासाठी काम करणारी मातृसंस्था आहे. या संस्थेची स्थापना स्वर्गीय आमदार आण्णासाहेब पाटील यांनी केलेली आहे .मराठा समाजाची संघटन व आरक्षणाचा लढा त्यांनी चालू करून स्वतःचे बलिदान दिलेले आहे .त्यांच्या विचारावर काम करणारी संघटना असून राज्यांमध्ये संघटनेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे संघटनेने मराठा समाजाच्या विविध प्रश्नाबाबत रस्त्यावरील लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई दिलेली आहे .संघटना वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आव्हान जगताप यांनी केले .
या बैठकीमध्ये बारामती सहकारी बँकेचे अभिषेक ढवान यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेबाबतची माहिती देऊन मराठा समाजातील नव उद्योजकांनी या राज्य शासनाच्या बिनव्याजी कर्ज प्रकरणाबाबतच्या योजनेची माहिती देऊन याचा फायदा लोकांनी घ्यावा यासाठी बारामती सहकारी बँक संपूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले .
या निवडीनंतर जिल्हा उपाध्यक्ष भारत खराडे म्हणाले की , मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या विचारधारेनुसार काम करून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असुन ते करत असताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाईल .
याप्रसंगी राजेगाव शाखाध्यक्ष म्हणून मनोज भोसले ,खानोटे शाखाध्यक्षपदी दत्तात्रेय शेळके , स्वामी चिंचोली शाखा अध्यक्षपदी अर्जुन मेंढे यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या
यावेळी भिगवन शाखाध्यक्ष छगन वाळके , पुणे जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे ,अमोल जगदाळे, अभयसिंह राजेभोसले, राजेगाव येथील अमोल मोरे ,मधुकर जाभले, राजेंद्र बोंद्रे ,नाना ढमे ,भारत भोसले, चंद्रकांत मोरे, शहाजी गुणवरे ,सचिन मोरे, महादेव बगाडे व मराठा महासंघाचे पदाधिकारी सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.