पुणे जिल्हा ग्रामीण
दौंड तहसिल कार्यालयात मतदान यंत्र जनजागृती कक्ष तयार…..
दौंड (टीम – बातमीपत्र)
दौंड प्रशासकीय इमारतीत मतदान यंत्र जनजागृती कक्ष तयार करण्यात करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांना उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी मार्गदर्शन केले .
नवमतदारांमध्ये मतदार प्रक्रियेसंदर्भात जनजागृती होऊन मतदान प्रक्रियेत त्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा, या हेतूने भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसील कार्यालयात मतदान यंत्र जनजागृती कक्ष उभारण्यात आला आहे.
सदर कक्ष आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेपर्यंत सुरु राहणार असल्याचे दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले .यावेळी निवडणुक नायब तहसीलदार गिरीश कांबळे , हरिश्चंद्र फरांदे तलाठी दौंड
व तहसील कार्यालयातील कर्मचारी देखील उपस्थित होते.