क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

महादेव बुक गेमिंग ॲपवर कारवाई ,९३ जण ताब्यात ; स्थनिक गुन्हे शाखा व नारायणगांव पोलिसांची कारवाई …..

पुणे (टीम – बातमीपत्र)

महादेव बुक अॅप या अनाधिकृत ऑनलाईन गेमींग अॅपद्वारे चालू असलेल्या सट्टेबाजीवर कारवाई करत लॅपटॉप, मोबाईल व इतर साहीत्य असा एकूण ६२ लाख ७४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ९३ इसम स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगांव पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही महिन्यांपासून अनाधिकृत महादेव बुक अॅप या ऑनलाईन अॅपद्वारे ऑनलाईन सट्टेबाजी केली जात असल्याने देशभरात ठिकठिकाणी छापेमारी करणेत आलेली आहे. महादेव बुक अॅप या अनधिकृत ऑनलाईन अॅप‌द्वारे पुण्याचे नारायणगावात सट्टा खेळविला जात आहे अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. त्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना माहिती दिलेनंतर त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांना दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दि. १५ मे रोजी नारायणगाव शहरातील व्हिजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स मधील तीन मजली इमारतीत गोपनीय बातमीचे आधारे छापा कारवाई करणेत आली. छापा कारवाई दरम्यान एकूण ९६ इसम हे लॅपटॉप, मोबाईल व इतर साहीत्याचे मदतीने अनाधिकृत ऑनलाईन महादेव बुक अॅपद्वारे ऑनलाईन गेमींग मध्ये सट्टेबाजी करत असताना मिळून आले. या इमारतीचे संपुर्ण तीन मजले भाडे तत्वावर घेवून इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे महादेव बुक अॅपद्वारे ऑनलाईन पैसे घेवून सट्टेबाजी खेळवत असताना एकूण ९६ इसम मिळून आले आहेत. त्यांचे ताब्यातून सट्टेबाजी करीता आवश्यक असणारे साहित्यामध्ये ४५ लॅपटॉप, ८९ मोबाईल, आरोपींचे वापरते १०१ मोबाईल, ४५२ बँक खाते पुस्तक व चेकबुक, टेबल, खुर्चा तसेच असा एकूण ६२ लाख ७४ हजार ५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

गुन्हयाची व्याप्ती मोठी व आरोपी संख्या जास्त असल्याने यातील आरोपींना मा. न्यायालयात हजर करण्यात आले, यातील मुख्य पाच आरोपींची दि. २०/०५/२०२४ रोजी पर्यंत पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. तसेच इतर उर्वरीत आरोपीं यांचेकडे पुरेसा वेळ घेवून तपास करणे असल्याने त्यांची पोलीस कस्टडी रिमांडचा हक्क अबाधीत राखून त्यांची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (भा.पो.से.) लोणावळा विभाग एस.डी.पी.ओ. सुदर्शन पाटील , एस.डी.पी.ओ. रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जुन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतिश होडगर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, दशरथ चिंचकर, नारायणगाव पो स्टेचे सपोनि महादेव शेलार, पोसई जगदेवप्पा पाटील, विनोद धुर्वे स्थागुशा चे पोलीस अंमलदार महेश बनकर, मंगेश थिगळे, अतुल डेरे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, दत्ता तांबे, हेमंत विरोळे, संदिप वारे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, विजय कांचन, राजु मोमीण, राहुल पवार, प्रकाश वाघमारे, ज्ञानदेव क्षिरसागर, अमोल शेडगे, समाधान नाईकनवरे, तुषार भोईटे, मंगेश भगत, रामदास बाबर, निलेश सुपेकर, प्रसन्नजित घाडगे, अक्षय सुपे, काशिनाथ राजापुरे, दगडु विरकर, अमीरू‌द्दीन चमणशेख, अतुल फरांदे, नारायणगाव पोस्टे चे पोलीस अंमलदार दत्ता तळपाडे, संतोष कोकणे, शैलेश वाघमारे, सत्यम केळकर, सचिन सातपुते, सोमनाथ डोके, गोरक्ष हासे, आदिनाथ लोखंडे, दत्ता ढेंबरे, मंगेश लोखंडे, संतोष साळुंखे, गोकुळ कोळी जुन्नर पोस्टे चे अंमलदार सागर शिंदे, गणेश शिंदे, आळेफाटा पो स्टे चे निलेश खैरे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!