पुणे जिल्हा ग्रामीणराज्य
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधणार नागरिकांशी संवाद….
पुणे (टीम – बातमीपत्र)
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर असून दुपारी २ ते ४ या वेळेत ते नागरिकांशी विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे येथे संवाद साधणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर आयुक्त समिक्षा चंद्राकार यांनी कळविले आहे.