पिंपळगाव सोसायटीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट…
राहू(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील पिंपळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला नाबार्डसह देशभरातील विविध राज्यातील सहकारी बँका, सोसायटीचे सचिव, आदी सह सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
पुणे जिल्हा मध्ये 1309 सोसायट्या कार्यरत आहेत. पिंपळगाव सोसायटी ची स्थापना ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अगोदर झालेली आहे. या संस्थेने 105 वर्ष पूर्ण केले असून संस्थेचे सुमारे दोन हजार सभासद आहेत. संस्थेची स्वतःच्या मालकीची इमारत असून यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक व आयसीआयसी बँक भाडेतत्त्वावर आहेत. संस्थेचे स्वमालकीचे मंगल कार्यालय व शुद्ध पाणीपुरवठा प्लांट आहे. शेतकऱ्यांसाठी खत विक्री विभाग सुरु आहे.
तसेच भविष्यामध्ये शेतीपूरक औषधे, माफक दरात भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना अवजारे, कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शितोळे व संचालक दिपक कापरे यांनी दिली.
याप्रसंगी देशभरातून आलेल्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत प्रत्यक्षात सर्व ठिकाणी जाऊन माहिती घेतली. पिंपळगाव सोसायटी चे कार्य शेतकऱ्यांच्या हिताची असल्याची भावना संबंधित पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी नाबार्ड लखनऊ चे उपमहाप्रबंधक निखिल कुमार, अमित कुमार लाल, सुरतचे सहाय्यक प्रबंधक सौरव गोहिल, विनय कुमार, मध्यप्रदेशचे सतीश कुमार शर्मा, पिंपळगाव संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शितोळे, संचालक महेश शिंदे, दिपक कापरे, अर्जुन विश्वासे,बापू थोरात, अरुण थोरात,बाळू लडकत,संतोष विश्वासे, समन्वयक रमेश बांडे, विकास अधिकारी मारुती राऊत, शाखा प्रबंधक अमोल देवकर,सचिव गणेश पाडळे,आदी उपस्थित होते.