पुणे शहरशैक्षणिक

मंत्री उदय सामंत यांनी घेतला सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण कार्यक्रम तयारीचा आढावा

दिग्गजांच्या उपस्थित पूर्णाकृती पुतळयाचे १४ फेब्रुवारी रोजी अनावरण होणार

पुणे (BS24NEWS): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे १४ फेब्रुवारी रोजी अनावरण होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे – कृषीमंत्री दादाजी भुसे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच अधिसभा सदस्य आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून निर्माण होणारा एकोपा महत्त्वाचा- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक असा कार्यक्रम होणार होणार असल्याने नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे, अशा सूचना श्री.सामंत यांनी दिल्या. बैठकीनंतर श्री. सामंत यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराची पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!