राहू (BS24NEWS) सध्या सर्वच गोष्टींच्या दराने तेजी पकडली असून पशुखाद्य आणि चाराच्या किमतींमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. या वाढत्या किमतींमुळे पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.दूध उत्पादक शेतकरी यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी करत असून दुधाचा दर वाढीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पोषक वातावरण असल्यामुळे दुधाच्या उत्पादनात चांगली वाढ होत असते. मात्र सातत्याने वातावरणामध्ये होत असलेल्या बदलांमुळे अनेक पशूवर याचा विपरीत परिणाम होत आहे.थंडीमुळे दुभत्या जनावरांची वेतन क्षमता कमी होत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.
दूध उत्पादनाच्या तुलनेत चाऱ्याची किंमत जास्त
मागील वर्षी पशुखाद्यामध्ये ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली असून दूध उत्पादनावरील खर्च वाढत आहे मात्र दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. आता मात्र दुधाचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही असे दूध उत्पादक सांगत आहेत. त्याचबरोबर इंधन तसेच विजेचे वाढते दर पाहता उत्पादक संघ देखील चिंतेत पडला असून त्यांचा खर्च वाढला आहे. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाच्या जाळ्यात अडकलेला होता त्यात आता तो आर्थिक संकटात सापडला आहे.
अनेक ठिकाणी रसायनमिश्रित दूध तयार करतात ते बाजारपेठेमध्ये चढ्या दराने विकले जाते या बनावट दुध खरेदी-विक्रीवर अंकुश बसल्यास शेतकऱ्यांना चार पैसे चांगली मिळतील असा विश्वास शेतकरी वर्गामधुन व्यक्त होत आहे.
गाईच्या दुधाला किमान तीस ते पस्तीस रुपये दर अपेक्षित असताना शेतकरी व दूध उत्पादकांना केवळ बावीस ते पंचवीस रुपये दर मिळत आहेे. गाई म्हशीला लागणारा चारा, खुराक व इतर गोष्टींचा विचार केला तर शेतकर्याच्या हातात काही शिल्लक राहत नाही. दुधाच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा दूध उत्पादकांना होती. मात्र दुधाच्या दरात अजूनही एक रुपयाची सुद्धा वाढ झाली नसल्याने शेतकर्यांनी आता हा दूध धंदा करायचा कसा प्रतिक्रिया पशुपालक बाळासाहेब जगदाळे,ज्ञानेश्वर पायगुडे,प्रकाश पिलाने यांनी व्यक्त केली आहे.