कुसेगाव येथे जनहित फाउंडेशनच्या वतीने अटल व्याख्यानमालेचे आयोजन
दौंड (BS24NEWS) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अटल व्याख्यानमालेचे आयोजन कुसेगाव येथे करण्यात आले आहे . जनहित फाउंडेशनच्या वतीने या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असे तीन दिवस व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज फडतरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कुसेगाव येथे अटल व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे .तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत दिनांक 16 रोजी डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे यांचे शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर व्याख्यान होणार आहे . तर गुरुवार दिनांक 17 रोजी व्याख्याते मंगेश गावडे पाटील यांचे शिवकाळातील तरुण आणि आजचा तरुण या विषयावर व्याख्यान होणार आहे . दिनांक 18 रोजी कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज ढवळे यांचे धर्माचे पालन करणे पाखांड खंडण या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या व्याख्यान मालेचे आयोजन करण्यासाठी जनहित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज फडतरे ,अर्चना मनोज फडतरे , सुनिता शशिकांत शितोळे, ऍड उदय फडतरे ,दिलीप रंगनाथ शितोळे ,कुसेगाव चे माजी सरपंच रमेश भोसले ,भरत शितोळे , उत्तम रुपनवर ,राजू मोरे, नितीन दिलीप शितोळे ,श्रीकांत धोंडीबा शितोळे, गणेश रामचंद्र शितोळे ,किरण मनोहर गायकवाड ,भाऊसाहेब ज्ञानदेव सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे .