Gamesमनोरंजनशैक्षणिक

राहू येथील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत वाघोलीचा संघ विजयी

राहू (BS24NEWS) दौंड पंचायत समितीचे पाहिले सभापती स्व. बाबुराव वामनराव कुल व माजी आमदार स्व. सुभाष अण्णा कुल यांच्या स्मरणार्थ शंभूमहादेव प्रतिष्ठान राहू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक २०२२ या फुलपीच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये सचिनशेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली या संघाने व्ही.सी.सी. मांडवगण फराटा या संघाचा दणदणीत पराभव करून तब्बल 1 लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले.
४ फेब्रुवारी रोजी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते नारळ फोडून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली होती. दौंड तालुक्यातील व इतर तालुक्यातील मिळून तब्बल ६४ क्रिकेट संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.या स्पर्धेचा अंतिम सामना हा सचिनशेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली व व्ही. सी. सी.मांडवगण फराटा या दोन्ही संघामध्ये झाला. रोमहर्षक अशा अंतिम सामन्यात वाघोली संघाने मांडवगण संघाचा पराभव करत आमदार चषकवर आपले नाव कोरले. हा अंतिम सामना पाहण्यासाठी परिसरातील क्रिकेट शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेमध्ये विजयी संघ पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक सचिन शेठ भाडळे प्रतिष्ठान वाघोली- एक लाख रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक व्ही.सी.सी. मांडवगण फराटा -७५ हजार रुपये व ट्रॉफी,तृतीय क्रमांक मयुरभाऊ शेलार प्रतिष्ठान -५० हजार रुपये व ट्रॉफी,चतुर्थ क्रमांक सिद्धेश्वर पिंपळगाव -२५ हजार रुपये व ट्रॉफी, पाचवा क्रमांक – महागणपती रांजणगाव, सहावा क्रमांक -पारगाव, सातवा क्रमांक -रांजणगाव सांडस व आठवा क्रमांक – खेड या संघाला मिळाला.उत्कृष्ट फलदाज म्हणून पिंपळगाव चा संदीप शिंदे व मालिका वीर म्हणून आशिफ शेख यांचा सन्मान कारण्यात आला.
या क्रिकेट सामन्यांच्या बक्षीस वितरण प्रसंगी दौंड तालुक्याच्या माजी आमदार रंजना कुल, भीमा पाटस कारखान्याचे संचालक आबासाहेब खळदकर, सुखदेव चोरमले, सचिन हरगुडे, लक्ष्मण कदम, देविदास डुबे, कृष्णा शेळके, शरद कोळपे, मनिषा नवले,युवराज बोराटे, गणेश चव्हाण, गणेश शिंदे, दिगंबर मगर, निखिल चव्हाण, सागर डुबे, प्रतीक शिंदे आदी सह विविध मान्यवर उपस्थित होत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!