पुणे जिल्हा दूध संघासाठी वैशाली नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे
महिला राखीव गटातून केला अर्ज दाखल, पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष
दौंड (BS24NEWS प्रतिनिधी) पुणे जिल्हा दूध संघाच्या निवडणूकित अर्ज दाखल करण्याच्या शेवटी दिवशी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि महानंद च्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी आपला अर्ज दाखल केलेल्या नंतर दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अ गटातून राहुल दिवेकर यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर तीव्र इच्छुक असणारे सागर फडके यांच्या मातोश्रीना महिला गटातून पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू असताना, वैशाली नागवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सगळ्यांनाच धक्का दिला आहे.
दौंड राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दूध संघाच्या निवडणूकित दिवेकर आणि फडके याना उमेदवारी देत माजी आमदार रमेश थोरात यांनी समेट घडविण्याचा प्रयत्न करत असताना वैशाली नागवडे यांच्या एन्ट्री ने आता काय होणार याकडे सगळयांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप च्या सत्ता काळात राष्ट्रवादी काँग्रेस ला बऱ्याच नेत्यांनी रामराम करत भाजप मध्ये प्रवेश केला परंतु जिल्हयात वैशाली नागवडे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडत पक्षाबरोबर काम केले
प्रामाणिकपची बक्षिसी म्हणून वैशाली नागवडे यांना योग्य पद देऊन सन्मान केला जाईल असे वाटत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेश अध्यक्ष, राज्य महिला आयोग आणि पुणे जिल्हा बँकेच्या वेळी त्यांना डावलून इतरांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वैशाली नागवडे यांना आतातरी जिल्हा दूध संघाची उमेदवारी पक्ष देईल का हे पहावं लागणार आहे नागवडे यांना उमेदवारी दिल्यास त्या जिल्हा दूध संघाला प्रमुख दावेदार होऊ शकतात म्हणून दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते त्यांची उमेदवारी चा पत्ता कट करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
वैशाली नागवडे यांची पक्षात वरिष्ठ पातळीवर चलती आहे शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वसर्वा शरद पवार यांचे महिला धोरण वैशाली नागवडे न्याय देणार का ? वैशाली नागवडे यांना यावेळी देखील डावलल् जाणार का असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. दूध संघाची उमेदवारी ही केवळ शिडी आहे वैशाली नागवडे यांचे ध्येय मोठे आहे असे त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. शिवाय यावेळी वैशाली नागवडे यांना थांबवले तरी कोणाला संधी देणार आणि त्यांच्या जागी संधी मिळणारे वैशाली नागवडे यांना भविष्यात कशी मदत करणार हे आगामी काळाच सांगेल हे नक्की