औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केंद्राचा मोठा निर्णय
औरंगाबाद (BS24NEWS) गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या राज्यातील ३ विमानतळांचे नामकरण करण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच या विमानतळाचे नामकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली. देशातील एकूण १३ विमानतळांचे नामकरण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी आले असता कराड माध्यमांशी बोलत होते.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सक्षमीकरण उपक्रम – मंत्री नवाब मलिक
राज्यातील औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या विमानतळाला साईबाबा आणि कोल्हापूरच्या विमानतळाचे महालक्ष्मी विमानतळ असे नामकरण लवकरच केले जाणार असल्याचे भागवत कराड म्हणाले. औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील १३ विमानतळांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.