विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आचरणात आणावेत – सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव बाबळे
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असून योग्य वयामध्ये त्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाची उंच शिखरे पार करू शकतात
राहू (BS24NEWS) छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवत विद्यार्थांनी त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.येथील शिरकाई देवी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले.
याप्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सरपंच मंगल थोरात, उपसरपंच राजेंद्र दिवेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कसुरे, उपाध्यक्ष सचिन शितोळे, मुख्याध्यापक बाळासाहेब थोरात, विलास थोरात,उत्तम जावळे, संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी पासलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन थोरात, दीपक कापरे, संतोष विश्वासे, हरिदास विश्वासे, दादा नातू,श्रीहरी नातू,राजेंद्र जगताप, अरुण कापरे, आदी सह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वाबळे म्हणाले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात. प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आज देशातील विविध पदावर कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वराज्य प्रत्यक्षात उतरवले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल करणे गरजेचे आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असून योग्य वयामध्ये त्यांना मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाची उंच शिखरे पार करू शकतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर सामाजिक ज्ञान मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद नागवडे यांनी केले.