कटारिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या विदयार्थ्यांनी जागवल्या शिवकालीन आठवणी
देऊळगावराजे (BS 24NEWS) स्वर्गीय सुरजबाई किसनदास कटारिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (दि. १८)फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांचे पोशाख परिधान करत सर्व उपस्थितांना शिवकाळाची आठवण करुन दिली. लेझीम व ढोल ताशांच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढली.
यावेळी फॅन्सी ड्रेस व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १००विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षक म्हणून प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापिका अरुणा मोरे , पहाणे सर व पाटील सर यांनी कामकाज पाहीले. याप्रसंगी दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसूख कटारिया, गोविंदशेठ अग्रवाल, भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, मुरलीधर भोसले, कानिफनाथ सूर्यवंशी, संजय भुजबळ पाटील, राधिका पहाणे पाटील व त्रिंबक भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या पाचपुते व शिक्षक सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.
कोविड नंतर शाळा सुरु झाल्यावर पहिलाच कार्यक्रम असूनही लहान मुलांनी सादर केलेल्या कलागुणांमुळे पालक वर्ग व पाहुणे मंडळींनी सर्व विदयार्थ्यांचे कौतुक केले.