चिमुकल्या नोमान आत्तारच्या “या” कृतीमुळे केडगावातील शिवभक्त झाले अचंबित
केडगाव येथील मुस्लिम धर्मीय चिमुकल्या नोमानने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये गाण्यावर ठेका.
केडगाव (BS24NEWS – प्रकाश शेलार) केडगाव ता. दौंड येथील चिमुकला मुस्लिम शिवभक्त नोमान जावेद आत्तार या चिमुकल्याने शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीमध्ये शिवचरित्रावरील आरतीवर धरलेल्या ठेक्यामुळे चिमुकल्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे नोमानने हातामध्ये भगवा झेंडा घेतला आहे.झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
राजा तू राजा सामर्थ्यवंत! जाणता राजा तू योगी श्रीमंत!! या आरतीवरती ठेका धरल्यामुळे युवकांनी अक्षरशः चिमुकल्याला खांद्यावरती घेतले आहे. नोमानने उस्फूर्तपणे गाण्यास प्रतिसाद दिला आहे.नोमान हा जवाहरलाल विद्यालयांमध्ये पाचव्या इयत्तेत शिकत असून शाळेमध्ये अत्यंत हुशार असल्याची माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. शाळेमध्ये वक्तृत्व, निबंध स्पर्धेमध्ये नोमानचा उस्फुर्त सहभाग असतो. आज दिवसभर सोशल मीडियावरती नोमानची चर्चा होती. नोमानचे वडील जावेद आतार यांचा बांगडी व्यवसाय असून आई घरकाम करते. मुलाने केलेल्या या कृत्याचा त्यांना अभिमान वाटतो.
विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आचरणात आणावेत – सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव बाबळे
दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर, डॉक्टर संदीप देशमुख यांनी ओमानचे कौतुक केले आहे. यासंदर्भात चिमुकला ओमान आतार म्हणाला की, लहानपणापासून मला महाराजांबद्दल आदर आहे. या जयंतीमध्ये मी सहभागी झालो. सर्वांनी माझे कौतुक केले आहे.