गजानन महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – स्वप्निल शहा
दौंड (BS24NEWS) दौंड येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने गजानन महाराज मंदिरात सोमवार (दि. २१) पासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल शहा यांनी दिली.
सोमवारी सकाळी ८ वाजता सुदर्शन जप संकल्प हा धार्मिक सोहळा सुरू होणार आहे. दरम्यान, दुपारी होमहवनाचा कार्यक्रम होईल. मंगळवार (दि. २२) रोजी सकाळी ७ वाजता सहस्रावर्तन तर सायंकाळी ७ वाजता अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार (दि.२३) रोजी सकाळी श्रींचे सहस्रदर्शन,अभिषेक तसेच दुपारी श्री गजानन महाराजांचा जन्मसोहळा होईल. सायंकाळी चारुदत्त आफळे यांचे कीर्तन होणार आहे.
येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याचे काम श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने भाविकांच्या सहकार्याने हाती घेतले आहे. तेव्हा या जीर्णोद्धारांतर्गत मंदिरातील दीपमाळेचा पायाभरणी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. तेव्हा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष स्वप्निल शहा यांनी केले आहे.