पुणे जिल्हा ग्रामीणशैक्षणिक
शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीस अचानक लागली आग,
कोणतीही जिवितहानी नाही
कुरकुंभ (BS24NEWS) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद हद्दीत आज सोमवारी (दि. २१) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणार्या टाटा मॅटीझ (एमएच -१२, जीझेड -२७२५ ) ही गाडी शाळेचे विद्यार्थ्याची वाहतूक करणारी गाडीस अचानक आग लागल्याने पूर्ण जळून खाक झाली.
सुदैवाने प्रवास करणार्या व्यक्तींना आग लागल्याचे समजताच सर्व व्यक्ती बाहेर पडल्याने मोठी हानी टळली आहे.आग विझविण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी आग विझवेपर्यंत संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. गाडीला अचानक लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही.