आन दौंडच्या व्यापाऱ्याचे पैसे मिळाले परत….
न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून दौंड पोलिसांनी व्यापारी सुखेजा यांची हस्तगत केलेली रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली
दौंड (BS24NEWS) दौंड शहरातील किराणा मालाचे घाऊक व्यापारी भक्तुशेठ सुखेजा आपले दुकान बंद करून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील १९ लाख रुपयांची पिशवी लुटून नेली होती. याबाबत दौंड पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता.
शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या गाडीस अचानक लागली आग,
पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस पथकाने या दरोड्याच्या घटनेचे गांभीर्य ओळखून अत्यंत वेगाने व नियोजित तपास करीत अवघ्या बारा तासात आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून ९ लाख ८२ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात यश आले होते. दौंड पोलिसांच्या या कामगिरीची जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दखल घेत तपास पथकाचा विशेष सत्कार केला होता. आज (दि. २१) रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून दौंड पोलिसांनी व्यापारी सुखेजा यांची हस्तगत केलेली रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
दौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
या वेळी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस उपनिरीक्षक महेश आबनावे, सुशील लोंढे, शहाजी गोसावी, भगवान पालवे, सतीश राऊत, सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे , पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, सुनील सस्ते, सुभाष राऊत, सचिन बोराडे, अमोल गवळी, अमोल देवकाते, किरण डुके, आदेश राऊत, अभी गिरमे, रवी काळे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.