पुणे जिल्हा ग्रामीण

बचत गटास मोफत बोलेरो पिकअप वाहनाचे वितरण

भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचा पुढाकार

देऊळगावराजे (BS24NEWS)

 भाजपचे किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मदतीने शिरापूर (ता .दौंड) येथील मागासवर्गीय शेतकरी बचत गटाला भारतीय कुर्षी अनुप राष्ट्रीय अजेविक स्ट्रेस प्रबंधक संस्था , माळेगाव ता. बारामती या संस्थेकडून वासुदेव नाना काळे या शेतकरी बचत गटाला डीफ्रिजर बोलेरो पिकअप व्हॅन हि शंभर टक्के अनुदानावर मोफत देण्यात आली आहे. या डी फ्रिजर पिकअप व्हॅन मुळे बचत गट आर्थिक दृष्ट्या भक्क होण्यास मदत होणार आहे . या व्हॅनचे वितरण भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते बचत गटाला देण्यात आले आहे.

  दौंड तालुक्याच्या पूर्वभागात यापूर्वी मोफत शेळी कोंबडेच्या खुरावडे यांचे वाटप केले आहे तसेच पेडगाव (ता .दौंड) येथील महिला बचत गटाला मोफत अवजारासहित ट्रॅक्टर वाटप करण्यात आला आहे असे हरिभाऊ डाळींबे यांनी सांगितले.

याप्रसंगी शिरापूरचे सरपंच सुनंदा फाळके ,उपसरपंच विनय पानवकर

माजी सरपंच केशव काळे , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रशांत साळूखे ,बचतगटाचे अध्यक्ष गोपाळ खुडे, उपाध्यक्ष सचिन कर्वे विलास डाळींबे, मधुकर गोडसे ,सुधीर फाळके ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सातव दिलीप सांगळे, सोमनाथ बर्डे ,रुपाली गोडसे आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!