कृषीपुणे जिल्हा ग्रामीणराज्य

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा : वासुदेव काळे

शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ भाजपचा महावितरणच्या कार्यालयावर निषेध मोर्चा 

दौंड (BS24NEWS) महाविकास आघाडी सरकार हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम करत आहे. राज्यात सरकार आहे का नाही अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. दौंड तालुक्यात नदीला पाणी आहे,  पाणी बोरला आहे, विहिरीला पाणी आहे, परंतु शेतकरी वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे,  वीज कनेक्शन कट केलेली आहेत,  त्याच्यामुळे हा शेतकरी आपली उभी पीक वाया जातात की अशा प्रकारच्या चिंतेमुळे ग्रासला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की शेतकऱ्यांचे वीजबिल त्वरित माफ करून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा असे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केले. महावितरणकडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने दौंड तालुक्यातील दापोडी येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वासुदेव काळे बोलत होते.

शेतकऱ्यांची वीजतोडणी व वीजबिल वसुली थांबविण्यासाठी भाजपाचा महावितरणवर मोर्चा..

पुढे बोलताना काळे म्हणाले की, महावितरण कडून शेती पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा आज वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर काढण्यात आला आहे. त्याच्या मध्ये शेतक-यांची एकच मागणी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विजबिलाबाबत चुकीचे धोरण राबवित आहे. चुकीची बिले वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिलेली आहेत. चुकीच्या वीज बिलांमुळे वीज बिल भरायला तयार असणारा शेतकरी मागे सरत आहेत. आमची मूलभूत मागणी अशी की या सरकारने डिसेंबर 2021 पर्यंतची संपूर्ण वीज बिल माफी करावी. 1 जानेवारी 2022 पासून शेतकऱ्यांना नव्याने वीजबिल आकारावे.

महावितरण कडून विद्युत रोहित्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी

पुणे जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा कांचन कुल, यावेळी बोलताना म्हणाल्या कि, आता काढण्यात आलेला मोर्चा हा दौंड तालुक्याचा मोर्चा आहे. परंतु हा संपूर्ण राज्याचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्यायला संवेदनशील काळजी लागते, परंतु राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल की राज्याला असे मुख्यमंत्री मिळालेत की ते आपल्या बंगल्यातुन बाहेर यायला तयार नाहीत. अशी जोरदार टीका कांचन कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर केली. पुढे त्या म्हणाल्या की, भाजपाचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत होते.त्यावेळी एकाही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला नव्हता.

भाजप सरकार आणि ईडी ने केलेल्या कारवाई चा जाहीर निषेध – रमेश थोरात

या मोर्चावेळी भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष कांचन कुल, तानाजी दिवेकर, भाजपा तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बापू भागवत,  यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चा वेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!