पेरणे (ता. हवेली) येथे विद्युत महावितरणचे उपअभियंता विजय जाधव यांना भाजपाचा घेराव
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक प्रदीप कंद यांचे नेतृत्वाखाली आंदोलन
लोणीकंद (BS24NEWS) वीज कायदा कलम 56 (1) अन्वये शेतक-यांना कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीरपणे शेतपंपाचे विज प्रवाह बंद केल्याने पेरणे विद्युत महावितरणच्या कार्यालयाबाहेर आज हवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक प्रदीप कंद व व महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारणी सदस्य रोहीदास उंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली भाजपाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी संतप्त शेतक-याकडुन विद्युत महावितरणचे उपअभियंता विजय जाधव यांना भाजपा चा घेराव घालण्यात आला.
शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करून वीज पुरवठा त्वरित सुरळीत करण्यात यावा : वासुदेव काळे
या वेळी प्रदीप कंद व रोहीदास उंद्रे यांनी बोलताना वीज कायदा कलम 56 (1) अन्वये नोटिस न देता बेकायदेशीरपणे विद्युत महावितरणचे अधिकारी वीज पुरवठा बंद करत असुन हे त्यांचे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगितले तसेच विद्युत महावितरणने ताबडतोब शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच 2020 च्या अगोदरच सर्व शेतपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे अशा प्रकारे भाजपा चालु अधिवेशनामध्ये ठराव मांडणार असल्याचे सांगितले. संदीप भोंडवे व अॅड.धर्मेंद्र खांडरे यांनी आपल्या भाषणात बेकायदेशीर विज पुरवठा बंद केल्यास संतप्त शेतकरी विद्युत महावितरणच्या अधिक-यांना शेतात फीरकु देणार नाही असा इशारा दिला. पंचायत समिती सदस्य शामराव गावडे यांनी बेकायदेशीर विज प्रवाह बंद केल्यास शेतक-यांनी विद्युत महावितरण अधिका-यांकवर फौजदारी गुन्हे दाखल करावे त्यासाठी भाजपा कायदा आघाडीच्या वतीने न्यायालयामध्ये सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
शेतकऱ्यांची वीजतोडणी व वीजबिल वसुली थांबविण्यासाठी भाजपाचा महावितरणवर मोर्चा..
या प्रसंगी जिल्हा भाजपा सरचिटणिस श्री धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, प्रविण काळभोर, गणेश कुटे, शामराव गावडे, माऊली वाळके, संदीप सातव, गणेश चौधरी, अनिल सातव, विजय जाचक, नितिन गावडे, प्रदीप सातव, दीनेश झांबरे, संतोष तांबे, बाबासाहेब हरगुडे, संतोष पवळे, विक्रम गायकवाड, रविंद्र वाळके, दशरथ वाळके, रविंद्र कंद, राजेंद्र वाघमारे, विशाल गुजर, शरद आव्हाळे, दीपक लोणारी, प्रसाद तळेकर, रामभाऊ ठोंबरे, उमेश मोरे, सचिन हरगुडे, सुप्रियाताई गोते, रेखाताई वाळके, दत्तात्रय शिवले, सुजय वाळके आदी भाजपा नेते व बाधित शेतकरी उपस्थित होते.
महावितरण कडून विद्युत रोहित्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी
धरणे आंदोलन झाल्यानंतर उपअभियंता विजय जाधव व सहायक अभियंता अंकुश मोरे यांच्या सोबत शिष्टमंडळाने चर्चा केली व ताबडतोब विद्युत प्रवाह सुरु करण्यासंदर्भात विनंती केली. जाधव साहेब यांनी वरिष्ठांसोबत चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.