राज्यविशेष बातमी

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ – ‘वंदे मातरम्‌’ ने अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात..

विधानसभा तालिका सभाध्यक्षांची, विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर

मुंबई (BS24NEWS) : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत “वंदे मातरम्‌” ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका सभाध्यक्षांच्या नावांची विधानसभेत घोषणा केली. सदस्य सर्वश्री भास्करराव जाधव, संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाजासाठी विधानपरिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर यांनी तालिका सभापतींच्या नावांची घोषणा केली. सदस्य सर्वश्री श्रीमती मनीषा कायंदे, विक्रम काळे, रामदास आंबटकर आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!