गुलाब पुष्प देऊन बारावीच्या परीक्षार्थींचे स्वागत
राहू (BS24NEWS)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर प्रथमच ऑफलाईन पद्धतीने बारावीचे विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात असून राहू (ता. दौंड) येथील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
राहू येथील कैलास विद्या मंडळाच्या शाळेमध्ये 273 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. शाळेतील आकरा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेस सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गावचे सरपंच दिलीप देशमुख व संस्थेचे सचिव परशुराम शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक चिमाजी कूल, मुख्याध्यापक घनश्याम शिनगारे, उपमुख्याध्यापिका हेमलता जगताप,परिवेक्षक प्रकाश जगदाळे, केंद्रप्रमुख शांताराम टिळेकर,उपकेंद्र प्रमुख दिगंबर काळे व कैलास विद्या मंदिराचे सर्व शिक्षक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
परीक्षेसाठी यवत पोलीस ठाण्याचे अजिंक्य दौंडकर व संतोष कदम यांच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.