क्राईम

धक्कादायक.. राहू येथे एकाच वेळी आढळली ४ गावठी कट्टे, १ रिव्हॉल्व्हर व १३ काडतुसे

दौंड (BS24NEWS)  राहु (ता.दौंड ) येथून ४ गावठी पिस्टल,१ रिव्हॉल्वर व १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत ही कामगिरी यवतच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे .शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे

याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पाच आरोपी कडुन ४ गावठी पिस्टल, १रिव्हाॅल्हर, १३ जिवंत काडतुस, ४ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ९१हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यवत पोलीस स्टेशन हददीत सोसायटी निवडणुकीचे अनुषंगाने अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक राहु परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार निलेश कदम व गुरूनाथ गायकवाड यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, राहु गावातील महात्मा फुले चौकात दिनेश महादेव मोरे (रा. राहु ता. दौंड, जि. पुणे) व अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे व त्यांचे इतर तीन साथीदार हे बेकायदेशीर गावठी पिस्टल आपले कब्जात बाळगुन उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने यवत पोलीस स्टेशन पथकाने या ठिकाणी जावुन वरील इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपली नावे दिनेश महादेव मोरे (वय – २३ वर्षे,) ,(रा.राहु ता.दौंड जि.पुणे), अभिषेक उर्फ बारकु राजेंद्र शिंदे (वय -२० वर्ष, रा.भांडवाडी महात्मा फुले चौक राहु ता.दौंड जि.पुणे), अमोल शिवाजी नवले (वय ३० वर्ष,रा. कुंबडमळा सहकारनगर राहु ता.दौंड जि.पुणे), सचिन शिवाजी चव्हाण (वय २३ , रा. मारूती मंदीरा मागे राहु ता.दौंड जि.पुणे) , परमेश्वर दथरथ कंधारे (वय २३ , सध्या रा.भांडवाडी राहु ता.दौंड जि पुणे मुळ रा. वडीपुरी ता.लोहाजि.नांदेड) असे सांगितली त्यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडुन ४ गावठी पिस्टल, १ रिव्हाॅल्हर, १३ जिवंत काडतुसे, ४ मोबाईल फोन असा एकुण २लाख ९१हजार ३००  रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आरोपी विरूध्द यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कामगीरी पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते ,  उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरूनाथ गायकवाड ,संतोष कदम, रामदास जगताप, रविंद्र गोसावी, अजित काळे, प्रमोद गायकवाड, अजिक्य दौडकर यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!