पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ व्यक्तीचा दिड लाख रुपयांचा ऐवज भर दिवसा लुटला
दौंड शहारातील गोलराऊंडला घडला प्रकार
दौंड (BS24NEWS)
दौंड शहराततील रेल्वे सेवानिवृत्त धर्मराव मुनिय्या मलाका (वय 72)(रा. बालाजीनगर, दौंड) हे 5 मार्च रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दौंड कुरकुंभ रोडवरील गोलराउंड परिसरातून जात असताना मॅप किस माने तो स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून मला तुमचे वाहन व तुमची अंगझडती घ्यावयाची आहे असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या ह्या हातचलाखी काढून घेऊन गेला . यांची किंमत ही 1लाख 57हजार 500रूपये होती. याविरोधात
धर्मराव मलाका यांनी फिर्याद दिली असुन दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.
दरम्यान घडलेला प्रकार हा कायम स्वरुपी वर्दळीच्या ठिकाणी घडला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आत्ता दिवसाही गस्त घालून संशयित वाटणाऱ्याची चौकशी केल्यास अश्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.