पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमी

पारधी समाजातील सागर काळे झाला पोलीस

सागर यास घडवणाऱ्या आईचा साहित्यिक नामदेव भोसले यांनी केला सन्मान

पाटस (BS24NEWS)

पारधी समाजातील सागर एसआरपी काळे या हा मुलगा पोलीस सेवेत भरती झाला आहे . मोठ्या कष्टाने सागर याच्या आईने सागर चे शिक्षण पुर्ण केलं . आज महिला दिनाच्या निमित्ताने पारधी समाजातील साहित्यिक नामदेव भोसले यांनी शाल श्रीफळ देऊन सागर यास घडवणाऱ्या आई अनिता एसआरपी काळे यांचा सन्मान केला आहे .

यावेळी साहित्यिक नामदेव भोसले ,पाटस चे माजी सरपंच संभाजी खडके , डॉ मधुकर आव्हाड , मोघे, आदी मान्यवर उपस्थित होते .

 

 

सागर काळे पोलीस भरती झाल्याने जन्मजात गुन्हेगारी चा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील मुलाला पोलीस होण्याचा मान मिळाला आहे .

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच वंचित राहिलेल्या पारधी या समाजातील सागर काळे या मुलांने जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस होण्याचा मान मिळविला आहे . दौंड तालुक्यातील बिरोबावाडी मध्ये राहणारा सागर काळे याची पिंपरी चिंचवड शहर विभागातून पोलीस भरतीसाठी निवड झाली आहे.

 

सागर हा पाटस येथील विघ्नहर्ता अकॅडमी मध्ये सराव करत होता. घरची परिस्थिती एकदम हालाखीची असल्याने अकॅडमीचे संचालक शंकर काळे यांचे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. छोट्याशा झोपडीत राहणार्‍या सागरने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल सर्व स्तरातून त्याचं कौतुक केले जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!