हिंगणीबिर्डी ग्रामपंचायतने महावितरणच्या विरोधात घेतला आक्रमक महत्वपूर्ण निर्णय
देऊळगावराजे (BS24NEWS)
शेती पंपाची वीज त्वरित चालू करा नाहीतर महावितरण कंपनीने हिंगणीबेर्डी (ता. दौंड) येथे बसवलेले स्ट्रक्चर त्वरित घेऊन जा असा निर्णय ग्रामसभेत एकमताने घेण्यात आला आहे .
हिंगणीबेर्डीचे (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतची (दि.१०) रोजी विशेष ग्रामसभा सरपंच मनीषा यादव यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ही ग्रामसभा ओंकार तापकीर या युवा शेतकऱ्याच्या मागणीवरून बोलावली होती.
यावेळी ग्रामसभेत शेतकऱ्यांचा खंडित वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा,महावितरण कंपनीने विनापरवाना बसवलेले स्ट्रक्चर काढावे किंवा नियमितपणे भाडे सुरू करावे,शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाल्यास नुकसानभरपाई द्यावी, वीज पुरवठा ८तास आणि भाडे २४तासाचे का?,विज बिल दुरुस्ती स्थानिक पातळीवर व्हावी,ज्या शेतकऱ्यांना एचपी नुसार बिल येते त्यांना तीन चार महीने सूट द्यावी कारण चार महीने पावसाळा असतो, महावितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर, केबल वायर, ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल बदलणे हा रिपेरिंग खर्च पूर्ण महावितरणने करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. याचा ठराव ही घेण्यात आला आहे.
आता महावितरण कंपनी या मागण्याचे काय करणार? हे पुढील काळात पहावे लागणार आहे.
यावेळी सरपंच मनीषा यादव ,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कदम,त्रिम्बक भोसले,दादा माने ,संभाजी खैरे,बापू रणसिंग ,ग्रामसेवक मचिंद्र निगडे आदि उपस्थित होते.