शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात आक्रोश
मलठण (BS24NEWS)
मलठण येथील कृषी ग्राहकांना वीज त्वरित जोडून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन महावितरणला भरले आहेत. मलठण येथील महावितरण कर्मचारी गेली तीन महिन्यापासून लाइन दुरुस्तीच्या नावाखाली सतत वेगवेगळी कारणे देऊन वीज पुरवठा खंडित करीत आहेत. वीज वितरण कंपनीचे शेतकऱ्यांनी वीज बिलाचे दोन हप्ते भरलेले असताना देखील विज बिल वसुलीचा तगादा देऊन कर्मचारी विद्युत पुरवठा खंडित करीत आहेत.शेतकऱ्यांना शेतीतून पैसे येण्याच्या वेळेसच महावितरणकडून वीज पुरवठा थेट सबस्टेशनमधून खंडित केला जात असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जात आहेत.शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे मात्र, विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात व्यस्त आहेत.दोन दिवसात वीज विद्युत पुरवठा जोडणी केली नाही तर मलठण ग्रामस्थांच्या वतीने मलठण सबस्टेशनला टाळा लावण्यात येईल.तसेच मलठण येथिल सबस्टेशन वरून मलठण गावाला वीज जोडावी असे मलठण ग्रामपंचायत व मलठण ग्रामस्थांच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना मलठण येते निवेदन देण्यात आले आहे.