ऊर्जामंत्र्यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर दौंडमधील आमरण उपोषण मागे
देऊळगावराजे(BS24NEWS)
देऊळगावराजे(ता. दौंड)येथे सोमवार (दि.१४)पासून महावितरण कंपनीच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यु गिरमकर व हिंगणीबेर्डी येथील युवा शेतकरी ओंकार तापकिर हे उपोषणाला बसले होते. या मागण्यांवर अधिवेशनात आवाज उठवला जाईल शेती पंपाची सक्तिची विज बिल वसूली थांबवून शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, खंडित वीज पुरवठा त्वरित पुर्ववत करावा या प्रमुख मागण्या करीता हे उपोषण सुरू केले होते.
आज मंगळवारी (दि.१५) रोजी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्वच आमदार यांनी विजतोडणी तात्काळ थांबवुन तोडलेली विज जोडुन द्या अशी मागणी जोरदारपणे लावुन धरली होती त्यावर राज्याचे उर्जा नितिन राऊत यांनी तीन महिन्यांपर्यंत विज तोडणी करण्यात येणार नसल्याचे सभागृहात सांगितल्यानंतर सुरू असणारे उपोषण लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा महिला मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा कांचन कुल,दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, लक्ष्मण रांधवन,तुकाराम आवचर, राजेंद्र बुराडे,जगन्नाथ बुराडे, नंदकिशोर पाचपुते ,राजेंद्र कदम, कनिफ सूर्यवंशी सतीश आवचर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी महावितरण कंपनीचे शाखा अभियंता महेश धाडवे आणि त्यांचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते .धाडवे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना वीज पूर्ववत जोडण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
यावेळी परिसरतील शेतकरी यांनी या उपोषणास साथ दिल्याने त्या सर्वांचे आभार अभिमन्यू गिरमकर यांनी व्यक्त करत आगामी काळात शेतकऱ्यांसाठी सतत संघर्ष करणार असल्याचे सांगितले.