जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार सागर तर सचिवपदी प्रसाद गायकवाड
दौंड (BS24NEWS)
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार सागर तर सचिवपदी प्रसाद गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयामध्ये हरिश्चंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये पुढील तीन (सन 2022 ते 2025) वर्षासाठी जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.
या प्रसंगी संघाचे विश्वस्त हनुमंत कुबडे,शिवाजीराव किलकिले,अरूण थोरात , आदिनाथ थोरात, रत्नदीप गवळी, रामचंद्र म्हेत्रे, विनायक सुंबे, रामचंद्र नातु, प्रविण साठे, सुरेश वाघमोडे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्ष सचिव व कौन्सिलर सदस्य उपस्थित होते.
यावेळी तालुका अध्यक्ष ,सचिव आणि जिल्हा कौन्सिलर सदस्य यांनी अनेक शैक्षणिक विषायांवर चर्चा केली. त्यामध्ये वार्षिक अहवाल सादर करण्यात व सर्वांनुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सभेचे सुत्रसंचालन सुरेश कांचन यांनी केले तर आभार प्रसाद गायकवाड यांनी मानले.