कुसेगावमध्ये सोसायटीत कपबशीची जादू…
श्री भानोबा ग्रामविकास सहकार पॅनेलचा दणदणीत विजय..१२ जागांवर मिळविले वर्चस्व....!
कुरकुंभ (BS24NEWS)
कुसेगाव(ता.दौंड) येथील श्री भानोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत श्री भानोबा ग्रामविकास सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.पॅनेलने सर्व १२ जागा जिंकून सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. श्री भानोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची संचालक पदासाठी १० जागांसाठी निवडणूक शुक्रवार (दि.१८) रोजी जिल्हा प्राथमिक शाळेत घेण्यात आली होती.तर दोन जागा या बिनविरोध झाल्या होत्या.पॅनेलकडून ही निवडणूक कपबशीच्या चिन्हावर लढवण्यात आली होती.दहा जागांकरिता झालेल्या निवडणूकीत विजयसिंह जयवंत शितोळे, राजाराम भगवान शितोळे,विकास आनंदराव शितोळे, अनिल दादासो शितोळे,बाळासो अभिमन्यू शितोळे,भुजंग नामदेव शितोळे,गजानन सर्जेराव शितोळे,सुरेश परशुराम शितोळे,शीतल भास्कर शितोळे,स्वाती सुनील शितोळे तर बिनविरोध नवनाथ रूपनवर, बाळासो सोनवणे हे संचालक पदी निवडून आले आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पोपट विलास हराळ यांनी काम पाहिले.सोसायटी स्थापनेपासून प्रथमच निवडणूक झाली होती.पॅनेल निवडुन आणण्यासाठी सरपंच छाया शितोळे,उप सरपंच अमोल शितोळे, दादासाहेब शितोळे,उद्योजक मोहन शितोळे, पांडुरंग शितोळे,प्रभाकर भाऊ शितोळे, विजय शितोळे, सुरेश शितोळे,माजी उपसरपंच मनेष शितोळे,दिनकर बापू शितोळे,दिपक शितोळे, विनोद शितोळे , प्रताप शितोळे, शिवाजी शितोळे,भाउसो शितोळे, बाळासो शितोळे, मनेष शितोळे, ग्रा. प. सदस्य दिपक रूपनवर, संतोष शितोळे, तंटामुक्ती अध्यक्ष शरद शितोळे, सागर आप्पा शितोळे,अनिल शितोळे , यांचे सहकार्य लाभले.