केमिकल चोरी प्रकरणी नऊ जणांना अटक – पोलिस निरिक्षक घुगे
दौंड (BS24NEWS)
कुरकुंभ (ता. दौंड ) येथील केमिकल चोरी प्रकरणी नऊ आरोपींना दौंड पोलिसांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक घुगे म्हणाले की ,कुरकुंभ (ता. दौंड ) येथील इटरनिस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनी मधील ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रूपये किंमतीचे रोडिअम ऑन अॅल्युमिना नावाचे कॅटिलिस्ट केमिकल चोरीला गेलेल्याचा गुन्हा दि.१६ मार्च २०२२ रोजी दाखल झाला होता. याबाबतची फिर्यादी विष्णु बाजीराव डुबे (वय ५६ वर्षे रा. रक्षकनगर, गोल्ड, बिल्डींग नंबर बी- ३ फलॅट नंबर ३०३, खराडी, पुणे १४) यांनी दिली होती.
यामध्ये राहुल बाळासाहेब काळे (वय 39, अहमदनगर), अंकीत वसंतराव जाधव वय 24,रा.रोटी ),श्याम प्रदिप इंगोले (वय 21 मुरखेड,), महेश तात्यासाहेब गायकवाड (वय 34,रा.कुरकुंभ ),गोकुळ महादेव धुमाळ (वय 39,रा. मुर्टी. बारामती), मल्लिकाअर्जुन विठ्ठल खेडगी (वय 31 रा.काशिमिरा ठाणे), डब्बू ऊर्फ भगेलु कहार (वय,31 राहणार उत्तर प्रदेश), उदयराज श्रीराम यादव (वय 60, मुंबई), विष्णू मच्छिंद्र विटकर ( रा. मोरे वस्ती दौंड) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोटयावधी रूपयाचे केमिकल चोरीला गेल्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ .अभिनव देशमुख यांनी गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपी अटक करण्याच्या सुचना दौंड शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना दिल्या होत्या . त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक घुगे यांनी वेगवेगळे तीन तपास पथके तयार करत तपासाची सुत्रे फिरवत दोन दिवसात २ आरोपी यांना अटक करून आज दि.२६ पर्यंत ९ आरोपी अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे , पोलीस उपनिरीक्षक सतीश राउत , सहा फौजदार कोळेकर, दिलीप भाकरे पोलिस हवालदार शंकर वाघमारे, पांडुरंग थोरात, सुभाष राउत, श्रीरंग शिंदे, पोलीस नाईक राकेश फाळके, अमोल गवळी, विशाल जावळे, महेश पवार, सचिन बोराडे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल राउत, अमोल देवकाते, योगेश गोलांडे, रविंद्र काळे यांनी आरोपी शोध पथकात भाग घेत कारवाई केली.