पाटस च्या आठवडे बाजारात धुळीमुळे नागरिक त्रस्त
खोकल्याने अनेकजण झाले बेजार
पाटस (BS24NEWS) पाटस ( ता. दौंड) येथील आठवडे बाजारात सोमवार दि. 28 रोजी मोठ्या प्रमाणावर धूळ हवेत पसरली होती . ही धूळ नाका-तोंडात गेल्याने बाजारात खरेदी साठी आलेले लोक आणि विक्रेते खोकुन- खोकुन बेजार झाल्याचे चित्र पहायला मिळाले . ग्रामपंचायत प्रशासन फक्त कर गोळा करणार का ? की काही नागरिकांच्या सोईसाठी काही उपाययोजना करणार आहे ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत .
पाटस गावचा आठवडे बाजार हा सोमवारी भरत असतो . बाजारतळ तयार करताना खाली मुरूम टाकण्यात आला होता . मात्र आता मातीचे प्रमाण वाढले आहे. ही धुळ हवेत पसरली जात आहे . सोमवारी आठवडे बाजारात हवेत सगळीकडे धुळ पसरली होती . या धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागला . धुळ नाका- तोंडात गेल्याने खोकल्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला . विशेषतः लहान मुले , वयोवृद्ध व्यक्ती यांना तर अधिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र बाजारात दिसून आले .
आठवडे बाजारात प्रचंड धुळीचे साम्राज्य आहे . सर्वांच्या नाकातोंडात धूळ जात आहे . बाजारात कर वसुली सक्तीने केली जाते . मात्र आज बाजारात धुळीचे साम्राज्य आहे त्याकडे कोण लक्ष देईल का ? नाका -तोंडात धूळ गेल्याने लहान मुले आजारी पडू शकतात . याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे — विशाल खंडाळे , ग्रामस्थ
याबाबत ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, पुढील आठवड्यात आदल्या दिवशी रविवारी पाणी मारण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.