क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अजुन एक केमिकल चोरीचा गुन्हा उघड ,१० जणांना अटक

दौंड (BS24NEWS)

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्जर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्जर कंपनीमध्ये दि. ५ मार्च २०२२ रोजी चोरट्यांनी सुमारे ४८ लाख १० हजार ११४ रुपये किमतीचे 56 ड्रम नायट्रो मिथेन केमिकल चोरीला गेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून तपासाबाबत पथके तयार करून उत्तरप्रदेश ,मुंबई, मध्यप्रदेश अशा प्रदेशामध्ये पथके पाठवुन या गुन्हयामध्ये एकूण १० आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक करण्यात आली आहे.आरोपी शंकर दिनकर झरेकर (रा.नानविज ,ता . दौंड जि.पुणे ), बिरप्पा मारुती लवटे (रा.गोपाळवाडी ता . दौंड जि.पुणे), ढब्बू भगेला कहार (रा.उत्तरप्रदेश ), केशव दत्तु रसाळ (रा.पाटस , ता.दौंड, जि.पुणे), विशाल दशरथ शितोळे( रा.खड़की , ता.दौंड जि.पुणे ), सचिन संजय गिरमे ( कुरकुंभ दौंड, जि.पुणे ) ,सागर मच्छिंद्र बारवकर ( रा.देऊळगावगाडा ता.दौंड,जि.पुणे ) ,महेश तात्यासाहेब गायकवाड़ (रा.कुरकुंभ, ता.दौंड जि.पुणे) , ब्रिजेश रामलवटण यादव (रा.मुंबई, भिवंडी ) ,संजय टिटलु यादव (रा.भिवंडी, मुंबई )यांना अटक करण्यात आलेली असून या आरोपींकडून १३ लाख ६२ हजार ७२९ रुपयाचे नायट्रो मिथेन केमिकल जप्त करणेत आलेले आहे. या आरोपींना दौंड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

या गुन्हयाचे तपासामध्येपोलीस निरिक्षक विनोद घुगे ,पोलीस उपनिरिक्षक सतिश राऊत , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल कोळेकर, पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे, वाघमारे, पांडुरंग थोरात , पोलिस नाईक राकेश फाळके, महेश पवार

पोलिस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!