“सोंगाचे गाव” राहूच्या यात्रेला आजपासून सुरूवात
यात्रा कमिटीच्या वतीने तयारी पूर्ण
राहू (BS24NEWS) राहू (ता. दौंड) येथील ग्रामदैवत शंभो महादेवाची दोन दिवस साजरी होत असलेल्या यात्रेची संपूर्ण तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
प्राचीन लोककलेची ऐतिहासिक परंपरा लाभलेले सोंगाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकारांना नवसंजीवनी देणारे,लोककला मोठ्या उत्साहात साजरे करणारे “सोंगाचे गाव” म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दौंड तालुक्यातील राहू गावाची ओळख आजही कायम आहे.
चैत्र शुद्ध एक प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला दोन दिवस मोठ्या उत्साहात ग्रामदैवत शंभो महादेव यात्रा भरते. शनिवार (दि.२) रोजी पहाटे महादेवाला अभ्यंग स्नान, विधिवत पुजा, महाभिषेक तर दुपारी बारा वाजता कावडींंची मिरवणूक, वटवृक्षाखाली आढ्या पाहणे, शंभो महादेवाला धार घालणे, पंचांग वाचन सांयकाळी सात वाजता तुकाई देवीचा छबिना, पालखी मिरवणूक, शोभेचे दारुकाम, रात्री आठ वाजता पारंपरिक सोंगाचा कार्यक्रम तसेच रविवार (दि.३) सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत कुस्त्यांंचा जंगी आखाडा होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.