नागेश्वर विद्यालयास दहावीच्या विद्यार्थ्यांनी बांधून दिला वर्हांडा
पाटस (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री नागेश्वर विद्यालयात १९८८ सालच्या इयत्ता दहावी च्या बॅच च्या विद्यार्थ्यांच्या वतीने वर्गणी जमा करून विद्यालयासने ३ लाख रुपये खर्च करुन ५०० स्क्वेअर फूट वर्हांडा बांधून देण्यात आला .या कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत माजी विद्यार्थ्यांनी हे कौतुकास्पद कार्य केले आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी हे होते . त्यांनी आपले मत व्यक्त करताना
रयत शिक्षण संस्थेने आजवर असंख्य विद्यार्थी घडवले आहेत .रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी हीच रयत शिक्षण संस्थेची खरी ताकद आहे . लोकसहभागातून , माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विद्यालयास आवश्यक अशी विविध कामे करण्यात येत आहेत . संस्थेसाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले .
पुढे बोलताना किसन रत्नपारखी म्हणाले की , यापुढील काळात विद्यालयात कामे करताना नवीन पॅटर्न नुसार कामे केली जातील . यामध्ये एखाद्या कामासाठी
५०% रक्कम संस्था देईल आणि ५० % रक्कम ही लोकवर्गणीतून जमा करावी .विद्यालयात विविध कामांसाठी अशा पध्दतीने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली .
रयत शिक्षण संस्थेच्या पाटस येथील श्री नागेश्वर विद्यालय व कै मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्य. विद्यालयास १९८८ साली इयत्ता १० मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ने ३ लाख रुपये खर्च करुन ५०० स्क्वेअर फुट वर्हांडा बांधण्यात आला .विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी जमा करत हे काम पूर्ण केले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेच्या पश्चिम विभागाचे विभागिय अधिकारी किसन रत्नपारखी , पाटस च्या सरपंच अवंतिका शितोळे, संस्थेचे जनरल बॅाडी सदस्य नामदेव शितोळे,स्कुल कमिटी सदस्य योगेंद्र शितोळे,,सत्वशिल शितोळे,प्रशांत शितोळे ,छाया शितोळे,
सिताराम भागवत , गणेश कुरुमकर यांसह १९८८ साल च्या बॅच चे सर्व माजी विद्यार्थी व रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.रेश्मा नरुटे तर आभार श्री.उत्तम रुपनवर यांनी मानले.