किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, दौंड शिवसेनेचे आंदोलन करत मागणी
दौंड (BS24NEWS)
भारताची शान आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या याने देशातील जनतेकडून प्रचंड पैसा निधी स्वरूपात गोळा केला व तो पैसा स्वतःच्या फायदा करिता वापरला त्यामुळे दलाल सोमय्या याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दौंड शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.शहारातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने दौंड पोलिसांना मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, अनिल सोनवणे,आनंद पळसे, देविदास दिवेकर, स्वाती ढमाले,रामदास काळभोर, अजय कटारे ,प्रसाद कदम, चेतन लवांडे आदी उपस्थित होते.
किरीट सोमय्या याने 2013 साला मध्ये आय एन एस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्या नावावर जनतेकडून प्रचंड निधी गोळा केला. नेव्ही नगर मध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी हजारो रुपये यावेळी दिले. सदरची रक्कम सोमय्या, भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होता. मात्र किरीट सोमय्या याने गोळा केलेली रक्कम राजभवना ला मिळाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या याने लोकांच्या देश प्रेमाशी खेळून देशाशी गद्दारी केली आहे . त्यामुळे त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
काल दि.7 एप्रिल रोजी शिवसेनेचे बारामती मतदार संघ समन्वयक शरदचंद्र सूर्यवंशी गटाने सोमय्या याच्या विरोधात दौंड पोलिसांकडे एफ आय आर दाखल केली आहे. एकाच विषयावर शिवसेनेमधील दोन गटांनी स्वतंत्र आंदोलन केल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली असल्याचे चित्र पहायला मिळाले.