पश्चिम महाराष्ट्राच्या ज्वलंत पाणी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आमदार राहुल कुल यांचे साकडे
आराखडा सादर करण्यसाठी आमदार कुल यांनी पुन्हा एकदा भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती.
दौंड (BS24NEWS) दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी (दि. ७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात दिवसेंदिवस पाण्याची परिस्थिती गंभीर बनत चालली असून, त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे जलविद्युत निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुखी नद्यांचे शंभर टीएमसी पाणी कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोर्यात जलविद्युत निर्मितीसाठी वळवण्यात आले आहे ते नैसर्गिक असणाऱ्या पूर्वमुखी बाजूला पुन्हा वळविल्यास पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील गंभीर होत चाललेल्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटण्यास मदत होणार आहे हि बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत याबाबात मार्ग काढावा अशी मागणी देखील आमदार कुल यांनी केली असून, या भेटी दरम्यान आमदार राहुल कुल यांनी पश्चिम महाराष्ट्राचा ज्वलंत पाणी प्रश्न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचवीला आहे.
आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) चे भेट घेत मानले आभार
आमदार कुल यांचा पाण्याच्या बाबतीत असलेला सखोल अभ्यास तसेच कोयना मुळशी प्रकल्पाचे पाणी पूर्वमुखी वळविण्यासाठी असलेल्या समितीत असलेला त्यांचा समावेश यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमदार कुल यांनी याविषयी सखोल माहिती दिली असून याबाबतचा आराखडा सादर करण्यसाठी पुन्हा एकदा भेटीसाठी वेळ मागितले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
विधानसभेत प्रश्न उपस्थित होताच वाळूमाफियांवर कारवाई
आमदार कुल यांनी दिल्लीत देशाचे गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्या शिंदे (सिंधिया) अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची देखील भेट घेतली याप्रसंगी त्यांच्यासोबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, समाधान आवताडे हे उपस्थित होते.