ओबीसी आरक्षणावर केंद्र आणि राज्य सरकारकडून दिशाभूल : रमेश कुसाळकर
पाटस (BS24NEWS)
केंद्र आणि राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमेंकाकडे बोट दाखवून समाजाची दिशाभुल करीत असून जातनिहाय जनगणनेशिवाय आरक्षण मिळणार नाही असे मत फुले शाहू आंबेडकर चळवळीचे विचारवंत रमेश कुसाळकर यांनी व्यक्त केले.
पाटस येथे महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती निमित्त प्रबोधनात्मक व्याख्यान माला आयोजित करण्यात आली होती. यावेळी रमेश कुसाळकर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांची दहा दिवस जयंती साजरी केली. शिवाजी महाराज यांचा काळ शेतकऱ्यांसाठी इतिहासातील एक सुर्वण काळ होता. मात्र सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. महात्मा फुले यांनी आत्महत्या रोखण्याचे तंत्र १८६९ मध्ये सांगितले. शेतकऱ्यांचा आसुड या ग्रंथात शेतकऱ्यांच्या समस्या मुळ आहे. गुलामिगिरी या ग्रंथात त्यांनी परखड लिखान केले. जो गुलामगिरी वाचेल तो कधीच मानसिक आणि शारीरीक गुलाम होणार नाही. बहुजन समाजासाठी महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॅा.बाबासाहेब आंबडेकर यासह सर्व महामानवांनी मोठा त्याग केला आहे. विविध राजकीय पक्षात विखुरलेल्या ओबीसी राजकीय नेत्यांनी आणि कार्यकत्यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी मोठे आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. जनगणनेशिवाय आरक्षण मिळणे अशक्य आहे, असे मत फुले शाहू आंबेडकर चळवळीचे विचारवंत रमेश कुसाळकर यांनी व्यक्त केले.
तसेच सकाळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मानवंदना करण्यात आली. व सायंकाळी झांज पथकाच्या आनंदी वातावरण महात्मा फुले यांची मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांना महात्मा फुले यांच्या आयुष्यावरील आधारित पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच अवंतिका शितोळे, माजी सरपंच योगेंद्र शितोळे, दौड पंचायत समितीचे उपसभापती विकास कदम, उपसरपंच छगन म्हस्के, साहेबराव वाबळे, जयंत पाटील, विकास कोळपे, बाबा कोळेकर, तानाजी केकाण, शंकर पवार, गोरख फुलारी, संभाजी देशमुख, प्रकाश भागवत, अशोक पानसरे तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.