नोकरीपुणे जिल्हा ग्रामीण

सहाय्यक अभियंतापदी गणेश गिरमकर यांची निवड

देऊळगाव राजे (BS24NEWS) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ परीक्षेमधून सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभागामधील ११४५ जागांसाठी परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यामधील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये २२० क्रमांकाने सहाय्यक अभियंता ग्रेड २ (राजपत्रित) या पदावर देऊळगाव राजे येथील गणेश हनुमंत गिरमकर याची निवड झाली आहे.

ओबीसी आरक्षणावर केंद्र आणि राज्य सरकारकडून दिशाभूल : रमेश कुसाळकर

गणेश याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजे येथे झाले तर अभियांत्रिकी शाखेत पुणे येथून त्याने पदवी प्राप्त केली आहे. आई वडिलांच्या पश्चात स्वकष्टाने व मेहनतीने शिक्षण घेऊन त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केल्यामुळे त्याचे परीसरातून विशेष कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देऊळगावराजेचे माजी उपसरपंच भरत बाळाराम गिरमकर यांचा गणेश हा पुतण्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!