आमदार राहुल कुल यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली चैतन्य हनुमानाची पुजा
जातीय सलोखा अबाधित असल्याचे झाले दर्शन
दौंड (BS24NEWS)
दौंड मध्ये सर्व धर्मियांनी एकत्र येते हनुमान जयंती साजरी केली. शहरातील चैतन्य हनुमान गाववेस मंदिरामध्ये महा अभिषेक करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना सुंटवड्याचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या भोंगा व हनुमान चालीसा विषयावरून वातावरण तापले जात आहे.मात्र आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी शहारातील मुस्लिम कार्यकर्त्यांना बरोबर घेत शहारातील चैतन्य हनुमान मंदिरामध्ये पूजा केली. यावेळी मंदिराचे पुजारी जयवंत गुरव , राजू जगदाळे, महेश जगदाळे, माजी नगरसेवक योगेश कटारिया, बबलू कांबळे , इक्बाल शेख, आरिफ शेख, फारुख खान, इमरान शेख, अख्तर काझी,अमोल काळे, गौरव सरनोत आदि उपस्थित होते.
हनुमान जयंती उत्सव समिती च्या वतीने राजू जगदाळे यांनी आमदार राहुल कुल व प्रेमसुख कटारिया यांचा सत्कार केला.
शहरात नुकतीच साजरी झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व आजच्या हनुमान जयंती उत्सवामध्ये येथील सर्वधर्मीय बांधवांनी सहभागी होत शहरात जातीय सलोखा अबाधित असल्याचे दाखवून दिले. हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करून वातावरण दूषित करू पाहणाऱ्या समाजकंटक प्रवृत्तींना चपराक बसावी या हेतूने आम्ही आज हनुमान जयंती पूजेला उपस्थित राहत , अशा प्रवृत्तींनी असे कितीही प्रयत्न केले तरी शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याला कदापि तडा जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे अशा भावना यावेळी मुस्लिम कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.