ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध
दौंड (BS24NEWS)
दौंड ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
दि.१९ एप्रिल रोजी सांगली येथे झालेल्या सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज व हिंदू धर्माच्या संस्कार व संस्कृतीबाबत टीका टिपणी केली. मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना भडकविणारे भाषण केले आहे, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचलेली आहे म्हणून ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने त्यांचा जाहीर निषेध करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी ब्राह्मण सेवा संघाच्यावतीने दौंड पोलिसांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी सावरकर स्मृतिस्तंभ समितीचे अध्यक्ष विवेक गटणे म्हणाले की, अमोल मिटकरी यांना ब्राह्मण समाजाबाबत बोलण्याचे काहीच कारण नाही, आम्ही त्यांच्या धर्माबाबत काही बोलत नाही त्यामुळे त्यांनाही इतर धर्माबाबत बोलण्याचा अधिकार नाही.
याप्रसंगी देवदत्त शिनोलीकर, सुधीर गटणे,अर्चना साने,विकास देशपांडे, अनंत जोगळेकर यांनीही आपल्या भाषणातून मिटकरी यांचा निषेध केला.
यावेळी ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष गोपाळराव नगरकर,रघुवीर अंतरकर,बाळकृष्ण पाठक, योगेश चापोरकर, अजय लेले,श्रीराम ग्रामपुरोहित, रेखा तारे आदि उपस्थित होते.