राज्य

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे दौंडच्या रेल्वे समस्या लवकरच मार्गी लावणार – आमदार राहुल कुल यांची माहिती

रेल्वे विभागाशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेख़ाली पुण्यात पार पडली बैठक

दौंड (BS24NEWS) – दौंड तालुक्यातील रेल्वे समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. रेल्वे विभागाशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेख़ाली व पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, वरिष्ठ यातायात अधिकारी ओम गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक सुनील मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पुणे येथे बैठक पार पडली.

या बैठकी मध्ये पुणे – दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व शहारातील रेल्वेच्या विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामधे दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारक कुटुंबियांच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, त्यांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत , सुवर्ण चतुर्भुज योजनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील ८ रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंग वर रोड ओव्हर ब्रिज (ROB) किंवा रोड अंडर ब्रिज (RUB) उभारण्यात यावेत , पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे तिसऱ्या मोरीचे काम दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रगतीपथावर आहे आवश्यक संरचना आणि पुशिंग बॉक्स तयार असुन मेगा ब्लॉकसाठी काम रखडले असल्याने मेगा ब्लॉकसाठी मंजुरी देवून तिसऱ्या मोरीचे काम पुर्ण करावे, दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी,

दौंड नगरपरिषदेने दौंड येथे पुणे – सोलापूर लाईनवर बांधण्यात येत असलेल्या नवीन आरयूबीच्या लगतच्या परिसरात पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन जोडणीचे काम डिपोजीट वर्क अंतर्गत करण्याची विनंती केली आहे सध्या तिसऱ्या मोरीचे काम होणार आहे त्यासोबतच पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइन जोडणीच्या डिपोजीट वर्क कामास परवानगी दयावी , दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे २० रूपये करावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा, वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर, उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी या मागण्यांच्याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असून याबाबात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

या बैठकीस राज्याचे राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार भिमराव तापकीर, संजय जगताप, माजी आमदार योगेश टिळेकर, बाळा भेगडे, जगदीश मुळीक, माजी नगरसेवक योगेश कटारिया, दौंड पुणे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, गणेश शिंदे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!